प्रमोद म्हशाखेत्री यांचा सत्कार
१५ आॅगष्ट २०२२रोजी प्रमोद मशाखेत्री या मूल येथील प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या शासकीय स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या हस्ते तहसीलदार रवींद्र होळी यांची उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
सरकार सेवा केंद्राचे वतीने शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून सरकार सेवा केंद्राचे संचालक म्हणून प्रमोद मशाखेत्री यांना प्रशस्तीपत्र देऊन मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार डॉ रविंद्र होळी यांंचेतर्फे गौरविण्यात आले होते.
प्रमोद म्हशाखेत्री हे ऑनलाईन व्यवसाय सोबतच आपलेेे सामाजिक दायित्व जोपासण्यासाठी. www.pmdigitalnews.com च्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव आज तालुका प्रशासनाने केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!