वडाळा वनविभाग कार्यालयाकडून काढण्यात आली बाईक रॅली..

वडाळा वनविभाग कार्यालयाकडून काढण्यात आली बाईक रॅली..
शेगाव.... जगदीश पेंदाम
 स्वातंत्र्य दिनानिमित्त वनपरीक्षेत्र अधिकारी(वन्यजीव) कार्यालय ताडोबा येथे ध्वजारोहण पार पाडण्यात आला ,ध्वजारोहणाला सर्व अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. ध्वजारोहण  झाल्यानंतर सर्व कर्मचारी यांनी बाईक रँली काढण्यात आली, रँली ही वडाळा आँफीस पासून सुरू करत वन परीक्षेत्रात येत असलेल्या सर्व गावांत रँलीचे आगमन झाले वनपरीक्षेत्रात येत असलेल्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळा वडाळा, आष्टा , किन्हाळा, कोकेवाडा(मानकर) , अर्जूनी तुकुम,सोनेगाव, कोकेवाडा (तुकूम ) ,वीलोडा , घोसरी, काटवल, खूटवंडा या गावातील शाळांना भेटी देऊन तेथिल विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वनपरीक्षेत्र कार्यालय ताडोबा यांच्या मार्फत  648 विद्यार्थ्यांना भेट वस्तू देण्यात आल्या व मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य व वनाबदल आणि देशाबद्दल प्रेम वाढवण्यात आले.  रँलीमध्ये वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक , पि.आर.टी सदस्य , आणि गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!