इंदिरा गांधी चौक चिमूर येथे तालुका काँग्रेस च्या वतीने ७५ वा अमृत महोत्सव वर्ष ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि.१५ ऑगस्ट २०२२ ला तालुका युवक काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी चौक चिमुर येथे ७५ वा अमृत महोत्सव वर्ष ध्वजारोहण सोहळा चिमुर विधानसेचे समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांचे उपस्थित दिलीपजी राचलवार उर्फ छोटू रचलवार यांचे हस्ते ध्जारोहण करण्यात आले.व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभ्यंकर मैदान (किल्ला) चिमूर येथे ७५ वा वर्धापन दिनानिमित्त चिमूर - ७४ विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व माजी गटनेता डॉ. सतिश वारजुकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी , शहर काँग्रेसचे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चिमूर वासीय जनतेची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!