अपंग विधवा निराधार लोकांना दरमहा मानधन त्वरित वितरित करा - प्रहार सेवक विनोद उमरे


उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिव्यांग विधवा तसेच निराधार वृद्ध लोकांना उपजीविकेसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील अपंग विधवा वृद्ध निराधार लोकांना दरमहा मानधन देण्यात येते व त्या मानधन चा उपयोग निराधार लोक उपजीविका तसेच औषधोपचारावर खर्च करतात पण मानधन शासनाकडून नियमितपणे मिळत नसल्यामुळे निराधार लोकांना उपजीविकेसाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निराधार लोकांना नियमितपणे मानधन मिळण्यासाठी वेळोवेळी समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे हे जनसामान्यांच्या कुठल्याही कामासाठी धावून जाऊन निस्वार्थ सेवा देत असतात.असगतच चिमूर तालुक्यातील मागील काही महिन्यांपासून अपंग, विधवा, वृद्ध  निराधार लोकांचे अनुदान थकीत असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालयात तसेच बँकेत चकरा मारीतआहे. अनुदान त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी व त्यांचे सहकारी प्रहार सेवक मुरलीधर रामटेके, माणिक मत्ते, सत्यपाल गजभे, सचिन घानोडे, मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!