सावली पंचायत समिती येथे रक्तदान शिबिर संपन्न





सावली (रंजीता नायडू)
पंचायत समिती सावली च्या वतीने सरपंच संघटना, ग्रामसेवक संघटना, शिक्षक संघटना, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ ऑगस्ट २०२२ रोज गुरुवारला ११.०० वा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पंचायत समिती, सावली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, सदर शिबिराचे उद्घाटक म्हणून परीक्षित पाटील साहेब, तहसीलदार सावली, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सुनीता मरस्कोल्हे, गट विकास अधिकारी तथा प्रशासक, पं. स. सावली, तर प्रमुख अतिथी म्हणून विजय कोरेवार माजी सभापती पं. स सावली, खंडारे सर, गट शिक्षण अधिकारी, पं स.सावली तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व ग्राम सेवक संघटनेचे अध्यक्ष इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या रक्तदान शिबिरामध्ये तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमा प्रसंगी दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात एकूण 55 जणांनी नोंदणी केली असून त्यापैकी 38 जणांनी  प्रत्यक्ष रक्तदान केले. सदर कार्यक्रम पंचायत समिती,  सावली येथिल अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने यशस्वी रित्यापार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!