तुळाणा गावात सैनिकाच्या हस्ते केले ध्वजारोहण
सी.आर.पी.एफ. जवान सचिन गंधारे यांच्या हस्ते झेंडा वंदन करणे गावाकऱ्यांकरीता अभिमानास्पद - सरपंच मनीषा ढेंगळे
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - देशात स्वातंत्र्याचा 75 वा अमृतोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे, या देशातील प्रत्येक शहर व गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामुळे सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे, वरोरा शहरापासून 4 किमी अंतरावर तुळाणा गाव आहे. गावाची लोकसंख्या 710 आहे.या गावातील बहुसंख्य लोक शेतकरी व शेतमजूर असून या गावात शिक्षणा करिता जिल्हा परिषद शाळा आहे.या शाळेतून गावातील काही मुले शिक्षण घेऊन पुढे शिक्षक, पोलीस, प्राध्यापक, डॉक्टर,इंजिनियर झाले याच गावातून सुमारे 22 वर्षांपूर्वी रवींद्र डाहुले यांची लष्करात निवड झाली, त्यानंतर 2014 मध्ये सचिन माधव गंधारे यांची निवड सीआरपीएफमध्ये श्रीनगर येथील पुलवामा ला झाली सद्या हा जवान पश्चिम बंगाल येथील सालबोनी मध्ये सेवा देत आहे. हा जवान नुकताच आपल्या तुळाणा गावात रजेवर आला आहे, या संधीचे खऱ्या अर्थाने सोने करून घेण्यासाठी गावातील जागृत नागरिकांच्या वतीने तुळाणा गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बावणे यांनी 15 ऑगस्ट रोजी जवानाच्या हस्ते तिरंगा फडकविण्याचा विचार सरपंच मनीषा ढेंगळे जवळ दर्शविला या विचारला सरपंचाने संमती दर्शवत सरपंचाने पोलीस पाटील बंडू ढेंगळे, तंटा मुक्ती अध्यक्ष शरद कुईटे, ग्रामपंचायत सदस्य समर्थ बोढे व उर्वरित ग्रामपंचायत सदस्यांसी चर्चा केली व सर्वांनी सहमती दर्शवली, परंतु ग्रामपंचायतीचा झेंडा वंदन करण्याचा पहिला अधिकार सरपंचाला राहते परंतु आपला हक्क दुसऱ्याला द्यायचा असेल तर सरपंचाने झेंडा वंदन करण्याचा अधिकार जवणाच्या नावाने लेखी संमतीपत्राद्वारे वरोरा तहसीलचे बीडीओ ला देऊन प्रशासकीय पूर्तता करून जवानाच्या हस्ते झेंडा वंदन करण्याचा मार्ग सुकर करून तुळाणा गावाला गौरवाचा क्षण सरपंच मनीषा ढेंगळे ने उपलब्द करून दिल्याने सर्वत्र सरपंच व संपूर्ण गावाचे कौतुक होत आहे.15 ऑगस्ट च्या दिवशी अभिमानाने आणि आनंदाने जवानाच्या हस्ते झेंडा वंदन केल्याने तुळाणा गावात एक वेगळेच देशप्रेमाचे वातावरण निर्माण झाले आहे या वातावरणात गावातील अनेक मुलींनीही जवानाच्या मनगटावर राख्या बांधून भावू बहिणीचा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सरपंच मनीषा ढेंगे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या गावातील मुलगा देशसेवेत सीमेवर तैनात असून काही दिवसांपूर्वी तो जवान रजेवर गावात आला आहे, यावेळी देशाच्या जवानाचा सन्मान करन्याची संधी मिळाली आम्ही सर्वांची संमती घेऊन जवानाच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला तसेच तुळाणा ग्रामपंचायतीच्या वतीने या जवानाचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.सरपंच सौ मनीषा ढेंगळे यांनी या वेळी सांगितले की यामुळे गावातील युवा वर्ग प्रेरणा घेऊन देश सेवेकरिता जाण्यासाठी मेहनत करतील व तुळाणा गावाचे नाव रोशन करेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी सैनिक सचिन गंधारे याने 15 ऑगस्ट रोजी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 1 ते 4 थी च्या सर्व विद्यार्थ्यांना नोट, बुक, पेन पेन्सिलचे वाटप केले. या गावाने खूप आदर केला.त्याबद्दल सरपंचासह सर्वांचे आभार या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात गावातील सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.यावेळी सर्व महिला, युवक,माजी सरपंच,माजी सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आसेकर, गेडाम सर ग्रामसेवक पंधरे व गट ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!