१६ ऑगस्ट ला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चिमूर दौरा आणि रस्त्यांची डागडुगी सुरू
ईतर दिवस नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष का ?
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर शहर हे क्रांती भूमीने नटलेले शहर आहे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी चिमूर या गावाला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांना चिमूर या गावातून पळवून लावले.आणि अशातच चिमूर शहराची ख्याती आहे. कि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची हि भूमी आहे.चिमूर ग्राम पंचायत चे उद्घाटन सुद्धा तुकडोजी महाराज यांच्या हस्ते झाले आहे. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.तर काही शहीद सुद्धा झाले.अशी या चिमुर शहराची ओळख असतांना चिमूर ला नगर परिषद होऊन ७ वर्षे च्या वर झाले आहे. परंतु विकासाच्या दृष्टीने बघावे तर शून्य आहे.दरवर्षी मोठे दिग्गज नेते मंत्री यांची चिमूर शहराला भेट देण्यासाठी चे ठरलेल्या कार्यक्रमाच्या वेळीच शहराची रंग रंगोटी आणि रस्त्यांची डाग - डुगी ची कामे केली जातात ती सुद्धा कुठल्याही पद्धतीची ई - निविदा न काढता हे नियमबाह्य असतांना लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष का? असा जनतेला प्रश्न पडला असून नगर परिषद क्षेत्रातील जनतेनी वारंवार नाली व रस्ते तयार करून देणेबाबत च्या तोंडी व लेखी तक्रारी देऊन सुद्धा जनतेला फक्त आश्वासन दिले जाते.निधी नाही अशी माहिती जनतेला अधिकारी वर्ग देत असतो.व १६ ऑगस्ट क्रांती दिनीच कुठल्याही कामाची सुरुवात होते असे का ? ते सुध्दा नियोजित असलेल्या मार्गाचीच शहरा आतील गल्ली मध्ये बघावे तिकडे घाणीचे साम्राज्य दिसून येते असे का ? याकडे विरोधी पक्ष नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!