दुषित पाण्यामुळे माकोना ग्रामवासिंयाचे आरोग्य धोक्यात
सावरी - प्रतिनिधी (विनोद उमरे)
सावरी : - चिमूर तालुक्यातील माकोना व सावरी गट ग्रामपंचायत असलेल्या गावात नळा द्वारे पाणीपुरवठा केला जाते . परंतु अलिकडे माकोना वासियांना नळा च्या माध्यमातून गढुळ वं गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने माकोना ग्रामवासियाचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरोज गढुळ व गाळ मिक्षित पाण्याचा पुरवठा होत असल्याने साथीचे आजार पसरण्याची देखिल शक्यता आहे. एकीकडे २५ दिवस संततधार पावसाने जनता हैराण झाली असताना दुसरीकडे दुषित पाणी पुरवठ्यामुळे माकोना येथिल नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दुषित पाण्यामुळे मलेरिया, हिवताप,अतिसार सारख्या साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नसुन माकोना ग्रामवासियांना शुध्द पाणी पुरवठा करावा अशी मागणी भिम आर्मि संविधान रक्षकदल महाराष्ट्र राज्य चिमुर तहसील तालुका प्रमुख जगदीश भाऊ मेश्राम नेतृत्वात आदोलंनकर्ते उमेश सुर्यवंशी, पवन डोईजड,पवन बोबडे,सुमित डुकरे,समीर सुर्यवंशी, चंदु पिंपळकर, विशाल डुकरे,नित्यानंद सुर्यवंशी माकोना ग्रामवासि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!