अर्जुनी - तुकुम, चारगाव मार्गावरील पुल उंच करा...
प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांची जि.प.बांधकाम विभागाकडे मागणी...
शेगाव... (जगदीश पेंदाम)
येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द ते अर्जुनी तुकुम या मार्गावरील असलेला पुल अत्यंत लहान असून दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली येतो त्यामुळे दोन ते तीन दिवस हा मार्ग बंद राहतो त्यामुळे नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो तेव्हा जनतेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार लक्ष्यात घेऊन या मार्गावरील पुल तात्काळ उंच करण्यात यावे असे निवेदन शेगाव येथील प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांनी जि.प.बांधकाम विभागाकडे निवेदनातुन केली आहे ...
सविस्तर असे की चारगाव खुर्द ते अर्जुनी तुकुम हा मार्ग आष्टा , विलोडा , मुधोली, मोहुर्ली ताडोबा तसेच चंद्रपूर जाण्यास मार्ग सोपा आहे त्यामुळे या मार्गावरून अनेक प्रवासी दररोज प्रवास करत असतात परिसरात अनेक गावातील नागरिक देखील शेगाव बू तसेच वरोरा या ठिकाणी दररोज कामासाठी जात असल्याने शेगाव ही परिसरातील मोठी बाजार पेठ असुन दळणवळण,दवाखाना येथे अनेक नागरिक आपल्या जीवनावश्यक वस्तूची खरेदी, विक्री करिता येत असून शेतकरी बी बियाणे धान्य विक्रीसाठी येत असतात.
या परिसरातील विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी वरोरा, शेगाव येथे जात असतात त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी तसेच जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दरवर्षी चारगाव धरण हे ओव्हर फ्लो झाल्यास जास्तीचे पाणी याच नदीतून प्रवाह करते शिवाय हा पुल 15 ते 20 वर्षा अगोदर बांधला असल्याने हा कमी उंचीचा बांधन्यात आला त्यामुळे या पुलावरून दर वर्षी पाणी सहा ते सात फुटांपर्यंत फेकले जाते त्यामुळे पाण्यातून वाट काढणे म्हणजेच मरणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. तेव्हा हि गंभीर समस्या लक्ष्यात घेऊन अर्जुनी - तुकुम चारगाव खुर्द या मार्गावरील हा पुल तात्काळ उंच करण्यात यावा अशी मागणी प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांनी जि.प.बांधकाम विभागाकडे निवेदनातून केली आहे.....


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!