चिमूर शहरात सर्रासपणे खुलेआम भट्टी लावून अवैध दारू विक्री व्यवसाय सुरु
पोलीस प्रशासन सुस्त
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्हा दारू बंदी हटविल्या नंतर चिमूर शहरात अनेक दारू माफियांनी वेगळी युक्ती लढवली असून शहरात १७ बिअर बार , १ बिअर शॉपी , ३ देशी भट्टी सुरु आहे.अवैध दारु व्यवसाय चालण्यासाठी अवैध व्यावसायिकांनी खातीकामठा वाल्मिक चौक येथे टिनेचा शेड , पक्के सिमेंटचे मकान तयार करून खुलेआम महिला व पुरुष मोहफुलाची व देशी दारू विक्री केली जात आहे.याकडे दारू बंदी (D.B) पथक कुठलीही कारवाई करीत नसून शेजारी राहणाऱ्या जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जर सर्रासपणे अवैध व्यवसाय असेच सुरू राहिले तर पोलीस प्रशासनावरून जनतेचा विश्वास उडून जाईल. म्हणून याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनता करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!