प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या मागणीला यश
अपंग विधवा निराधार लोकांना दरमहा मानधन वितरित
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिव्यांग विधवा तसेच निराधार वृद्ध लोकांना उपजीविकेसाठी व जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील अपंग विधवा वृद्ध निराधार लोकांना दरमहा मानधन वितरित करण्यात येत होते.त्या मानधन चा उपयोग निराधार लोक उपजीविका तसेच औषधोपचारावर खर्च करीता करत होते पण मानधन शासनाकडून नियमितपणे मिळत नसल्यामुळे निराधार लोकांना उपजीविकेसाठी खूप अडचणी चा सामना करावा लागत होता त्यामुळे निराधार लोकांना मानधन मिळण्यासाठी समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी तात्काळ मानधन देण्यात यावा अशी मागणी केली होती. व त्यांच्या मागणीला यश मिळाले असून अखेर अपंग, विधवा निराधार लाभार्थ्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!