स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना शाखा पवनी कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.२४ ऑगस्ट २०२२ ला स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना शाखा पवनी या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी , सामाजिक कार्यकर्ता दत्तू मुनरतिवार , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश सेलोकर, संपादक प्रदीप घाडगे,विलास मोहिणकर उप संपादक पब्लिक पंचनामा साप्ताहिक , पवनी पोलीस स्टेशनचे शिपाई विनोद आरीकर, ज्योती मातनकर प्रसंगी उपस्थित होते.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर जिभकाटे यांनी संघटनेचे उद्दिष्टे व कार्य स्पष्ट केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात पोक्सो कायदा २०१२ या संदर्भात माहिती दिली. सायबर क्राईमचे महत्व स्पष्ट केले.केव्हाही गरज भासल्यास स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेला मदत करेल असेही आस्वासण दिले.सामाजिक कार्यकर्ता दत्तू मुनरतिवार , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश सेलोकर, संपादक प्रदीप घाडगे पवनी पोलीस स्टेशनचे शिपाई विनोद आरीकर, ज्योती मातनकर यांनी भविष्यातील वाटचाली संबंधी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन पोलीस मित्र नगीना शेख यांनी केले.स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार तालुका व ग्रामीण पदाधिकारी व तसेच नवीन सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!