गोकुल मित्र मंडळ पवनी तर्फे दहीहंडी कार्यक्रम संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - गोकुल मित्र मंडळ पवनी तर्फे सक्सेना प्राथमिक शाळा आंबेडकर वार्ड, पवनी येथे दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व मित्र मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेली प्रमुख अतिथी आमदार नरेंद्र भोंडेकर, प्रशांत भुते, नरेश बावनकर , बंडूजी हटवार, गणेश मुंडले ,आशिष माटे,उप विभागीय अधिकारी रवींद्र राठोड भंडारा व इतर मान्यवर यांनी उद्घाटक प्रसंगी उपस्थितती दर्शविली होती. तसेच पवनी नगरीतील पोलीस निरीक्षक गढरी त्यांचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. दहीहंडी स्पर्धेमध्ये देशभक्ती गितांवर समूह नृत्य सादर केली. मोठ्या प्रमाणावर जनतेनी उपस्थिती दर्शविली होती.या दहीहंडी कार्यक्रमात जय बजरंग मंडळ बेलघाटा वार्ड पवनी यांना प्रथम पारितोषिक २२००० रुपयांचा देण्यात आला.हा कार्यक्रम शांततेत कुठल्याही प्रकारची हानी न होता पार पडला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!