शेगाव परिसरात विविध आजाराचे रुग्ण.... मलेरिया ,डेंग्यू , रुग्णांच्या संख्येत वाढ..




उपचारासाठी झोलाझाल डॉक्टर ग्रामीण भागामध्ये दाखल.... 
प्रशासनाचे दुर्लक्ष...  
 गावोगाव आरोग्य शिबिर राबवा...  अभिजीत पावडे...
शेगाव... (जगदीश पेंदाम)
 शेगाव ग्रामीण परिसरात गाव खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये अनेक आजाराने ग्रस्त असल्याचे रुग्ण आढळत असून ताप, हिवताप, डेंग्यू ,मलेरिया चे रुग्ण गावोगाव आढळत असून हे प्राण घातक आजार वातावरणातील हंगामी बदल्यामुळे तसेच आलेल्या अती पाऊसाने, सगळीकडेच ग्रामीण भागात सांडपाणी जमा झालेले आहे त्यामध्ये मच्छर,किडे, विविध प्रकारचे डासामुळे रोग पसरत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.. 
प्रत्येक गावोगावात मच्छर नियंत्रण फवारणी करण्यात येऊन प्रत्येक गावात गाव खेड्यात आरोग्य शिबीर राबविण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच आदिवासी कार्यकारी सहकारी सोसायटी चारगाव बुज.चे उपसभापती अभिजीत पावडे यांनी केली आहे..
  यावर्षी पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने परिसरात ग्रामीण भागात दूषित सांडपाणी साचले आहे तसेच हे सांडपाणी विहीर, हातपंप, बोअरवेल मधून शुद्ध न होता, मिळता दूषित पाणी ग्रामपंचायत कडून नळाद्वारे प्रत्येक घरात पिण्यासाठी सोडले जाते त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाच्या फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करताना दिसत आहे यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे झोलाझाल डॉक्टरांच्या अर्धवट ज्ञानामुळे कोरोना काळातही अनेक जण दगावले परंतु त्याची नोंद घेतली गेली नाही आहे    यावेळी पाऊस वातावरणातील हंगामी बदलामुळे शेगाव परिसरतील सर्वच भागांमध्ये आरोग्याची समस्या भेडसावत आहे शेगाव परिसरात जंगलात असलेल्या गावातील ग्रामीण भागातील जनतेमध्ये आरोग्याबद्दल पाहिजे त्या प्रमाणात जागरूकता नसल्यामुळे गावोगावी बोगस डॉक्टर मार्फत उपचार सुरू आहे. आजही शेगाव परिसरातील बहुतांश ग्रामीण भागातील पावसाळ्यातील रस्त्याच्या समस्या असल्यामुळे जनतेला वारंवार उपचारासाठी, आरोग्यासाठी वाहतूक साधन उपलब्ध होत नसल्यामुळे व प्राथमिक आरोग्य केंद्र 20 ते 22 किलोमीटर येत असल्यामुळे वाहना अभावी त्या ठिकाणी जाणे शक्य होत नसल्याने ग्रामीण जनतेला पर्याय नसल्यामुळे आरोग्याच्या उपचार बोगस डॉक्टरकडूनच करून घेतली जाते..
 कोणतीही वैद्य पदवी नसताना अनेक बोगस डॉक्टर परिसरातील जनतेला औषधे, इंजेक्शन, सलाईन देऊन उपचार करताना दिसून येतात. ग्रामीण जनतेचे लाखो रुपये परिपूर्ण उपचार अभावी दवाखान्यात जात आहे... 
तेव्हा बोगस डॉक्टर यांची दिवाळी होत असून गोरगरीब जनतेच्या खिसा रिकामा होत असल्यामुळे वरोरा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांनी  पाण्याचा साठा शुद्ध करूनच सोडावे तसेच गावातील विहीर, बोअरवेल, मध्ये ब्लिचिंग पावडर टाकावे...
शासनाने या गंभीर समस्याकडे गाव खेड्यांची पाहणी करून गावोगावात आरोग्य शिबीर लावून  गोरगरीब जनतेचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करून बोगस डॉक्टरांना आळा घालून उपचार थांबवावे अशी मागणी वरोरा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा उपसभापती चारगाव बू. चे युवा कार्यकर्ते अभिजीत पावडे यांनी केली आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!