घर जळालेल्या पिढीच महीलेला देण्यात आली आर्थिक मदत...

घर जळालेल्या पिढीच महीलेला देण्यात आली आर्थिक मदत...
शेगाव.. (जगदीश पेंदाम)
येथून जवळ असलेल्या अर्जुनी तुकुम गावातील ज्योती बावणे या महिलेच्या घराला लागलेल्या आगीमध्ये जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली होती याची दखल समाजसेवक डॉ. अंकुश आगलावे वरोरा तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे यांच्याकडून आर्थिक मदत  यावेळी देण्यात आहे...
 

घरातील सिलेंडरच्या गळतीने घरात आग लागली असुन घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आग लागल्याची माहिती नागरिकांना मिळतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली त्यामुळे परिसरातील इतर घरे बचावली आहे अर्जुनी गावात पतीचे निधन झाल्याने ज्योती संजय बावणे ही महिला आपल्या दोन मुलीसह वडीलांच्या घरातील झोपडीत राहत असलेल्याने मुलगी घरात स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरची गळती सुरू झाली व आग लागली घरातील अन्नधान्य सह,संपूर्ण साहित्य, शालेय पुस्तके आगी मध्ये सापडले आग लागल्याची माहिती नागरिकांना मिळतात घटनास्थळी धाव घेत घरातील विद्युत पुरवठा बंद करून आग विझवण्यात आली तोपर्यंत घरातील सगळं साहित्य जळून खाक झाले होते सदर घटना 22 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली असुन घटनेची माहिती मिळताच  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे,व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अंकुश आगलावे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व ज्योती संजय बावणे महीलेस आर्थिक मदत दिली यावेळी उपस्थित टिपले सर वरोरा, भारत श्रीरामे,वरोरा, सचिन नरड शेगाव, निलखंट वरभे उपसरपंच मेसा,अर्जुनी सरपंच यामिनी बोथले,प्रकाश हनवते,वसंता भोयर,योगेश खामनकर, संजय घागी, प्रदीप ग्रामपंचायत सदस्य अंकुश मडावी, सुनील बोडे,प्रदीप उरकुडे  तसेच गावातील नागरिक उपस्थित होते....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!