आज स्वातंत्र्य दिनी घोडाझरी पर्यटन बंद.

आज स्वातंत्र्य दिनी घोडाझरी पर्यटन बंद.


अतिवृष्टी व पुरामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आज घोडाझरी पर्यटन बंद चा विभागाचा निर्णय.
तळोधी बा (यश कायरकर)
    नागभीड तालुक्यातील पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेले घोडाझरी तलाव आज  पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.  दोन दिवसापासून सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे घोडाझरीचा सांडवा हा धोकादायक स्थितीत प्रवाहीत होत असून. त्यामुळे आज १५ आगष्ट ला घोडाझरी तलाव पर्यटनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
 आज १५ आगष्ट ला  घोडाझरी पर्यटन बंद असेल की सुरू असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते व वन विभागाने पर्यटन बंद ठेवू नये.  यामुळे पर्यटकांमध्ये निराशा होऊन,  घोडाझरी सलग सुरू ठेवण्यात यावा याकरिता नागभीड वन विभागाकडे पर्यटक आणि स्थानिक पत्रकारांद्वारे वारंवार मागणी करण्यात येत होती.  त्यामुळे १५ आगष्ट ला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पर्यटन सुरू ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला  होता. मात्र सततच्या दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसाने आज तो निर्णय मोडकळीस काढला. व आज घोडाझरी पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
            ज्ञमात्र 15 ऑगस्ट ला घोडाझरी मध्ये पण पर्यटनाचा आनंद लुटण्याचा मनसुबा ठेवून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना ही निराशेची बातमी असली तरी वन विभागाने स्व मर्जीने घेतलेला हा निर्णय नसून.  सतत सुरू असलेल्या पावसाने व निसर्गानेच हा निर्णय घेऊन आज आज पर्यटनासाठी घोडाझरी बंद ठेवण्यात भाग पाडले व पाऊस न थांबल्यास पुढील दोन दिवस सुद्धा घोडाझरी बंद राहण्याची शक्यता नकारता येत नाही.   
"आज घोडाझरी पर्यटनासाठी सुरू ठेवण्याचा आमचा मानस होता. मात्र पावसामुळे घोडाझरीचा ओव्हर फ्लो धोकादायक स्थितीत वाहत असल्याने, सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही आज घोडाझरी पर्यटन बंद ठेवलेला आहे."
   - एस. बी. हजारे, वन परिक्षेत्र अधिकारी नागभीड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!