वाघाच्या हमल्यात गुराखी ठार. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना.
वाघाच्या हमल्यात गुराखी ठार.
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना.
सिंदेवाही (यश कायरकर)
सिंदेवाही वन परिक्षेत्र अंतर्गत उपक्षेत्र- तांबेगडी मेंढा , नियतक्षेत्र - चिकमारा येथे काल गुरे चारायला गेलेला गुराखी संतोष डुकरू नैताम रा. चिकमारा, वय 63 वर्ष याला वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की चिकमारा येतील गुराखी काल आपले गुरे घेऊन जंगलात चारायला गेला असता सायंकाळ ला घरी परत न आल्याने ग्रामस्थ, वनविभाग सदस्य यांनी परिसरात शोध मोहीम राबविली. मात्र आज चिकमारा येथील कक्ष क्र. 266 मध्ये आज सकाळी 7:30 चे सुमारास गहाळ इसम मृत अवस्थेत आढळून आला.
मोक्यावर वन विभाग व पोलीस पथक दाखल होऊन पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही करून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे मृत इसमाचे शव विच्छेदण करण्यात आले आहे. मृताचे नातेवाईक यांना तातडीची मदत म्हणून ₹ 25,000/- वनविभागाकडून देण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!