स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्य जलतरण संघटनेकडून वृक्षारोपण संपन्न
प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल
सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या जलतरण संघटना मुल कडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला, शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतरफा आज 30 वृक्षांची झाडे लावण्यात आली होती, नगर परिषद मुल च्या वतीने वृक्षांची पूर्तता करण्यात आली, जलतरण संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आला, संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री किशोर कापगते, प्रमोद कोकुलवार, ऍड बल्लू नागोसे, प्रशांत मुत्यारापवार, गणेश वायडे, स्वप्नील माहोरे,वंश बोबाटे,उदय झाडे, प्रशिक घोगरे,अभिनव चौखुंडे,ओम पुटकंमवार तथा नगर परिषद मुल ची चमू उपस्थित होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!