जि. प. उच्च प्राथ.शाळा वायगाव (भोयर ) येथे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप...




टायगर ग्रुप चा उपक्रम...
शेगाव.... जगदीश पेंदाम

स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सलीम पठाण व टायगर ग्रुप यांच्याकडून जि प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव भोयर येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले..
मागील सहा वर्षांपासून परिसरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 15 ऑगस्ट दिनाचे अवचित साधून टायगर ग्रुप च्या वतीने दरवर्षी वेग वेगवेगळे साहित्य वाटप केले जात असुन   या वेळीसुद्धा परिसरातील वायगाव भोयर. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये 101 विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडी तील मुलांना छत्री, पेन, नोटबुक, बास्केट वस्तूचे वितरण टायगर ग्रुप च्या वतीने करण्यात आले..
या कार्यक्रमाकरिता गावातील नागरिकांनी टायगर ग्रुपचे ढोल ताशाच्या गजरामध्ये गावातून मुख्य मार्गाने रॅली काढून स्वागत करण्यात आले..
कार्यक्रमाकरिता उपस्थित टायगर ग्रुप चे अध्यक्ष सलीम पठाण, मधुकर श्रीरामे, निखिल भोयर, गावातील ज्येष्ठ सेवा निवृत्त शिक्षक वाबिटकर सर होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन हरिश्चंद्र नन्नावरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल चंदनखेडे सर यांनी केले...
प्रमुख पाहुणे भाषणामध्ये  गावातील सेवानिवृत्त शिक्षक वाबिटकर सर यांनी टायगर ग्रुप चे अभिनंदन करत  यावेळी स्वतःकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत शाळेकरीता देत मी सुद्धा या शाळेतील माजी विद्यार्थीच आहे असे उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन  करतांना सांगितले...
या कार्यक्रमाचे वेळी जि.प. उच्च प्राथमिक शाळा वायगाव भोयर चे मुख्याध्यापक राजू कुशमवार, शिक्षका निलीमा झाडे, शिक्षक हरिचंद्र नन्नावरे, नरेंद्र बोकडे, विठ्ठल चंदनखेडे, टायगर ग्रुप चे सदस्य नितेश कांबडी, बंडू नेवारे, पिंटू आवडे, मधुकर मेश्राम,विष्णू भलावी, किशोर हनवते, दीपक नेवारे, दिनेश गणवीर ,राजू कडवे, पंकज बनसोड तसेच गावातील  महिला,नागरिक मोठ्या प्रमाणात  यावेळी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!