सहा वर्षांच्या अल्पवयीनमुली सोबत अतिप्रसंगाचा प्रयत्न, आरोपीस अटक
तळोधी बा.
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत नागभीड तालुक्यातील खडकी (हुमा) येथे स्वप्निल अशोक बारसागडे वय 23 वर्ष याने पोळ्या करिता गावात आपल्या आई-वडिलांसोबत आलेल्या एका (सहा) 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गावातील मंदिराच्या मागे नेऊन तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच दुकानात असलेल्या एका महिलेच्या निदर्शनास येताच तिने गावातील लोकांना या घटनेबाबत सांगितले असता समय सूचकता दाखवीत गावातील लोकांनी त्याला पकडले. व त्या आरोपी जवळून त्या मुलीला सोडविले. व आरोपीला गावातील लोकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर पीडिताच्या पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपी स्वप्निल अशोक बारसागडे (२३) याच्यावर विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 376, 376 ए बी , 354 ए बी, भांदवी सह कलम 68 अंतर्गत पोस्को लावण्यात आला. असून आरोपीला 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
आरोपी स्वप्निल बारसागडे हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे गावातील लोकांद्वारे त्याला कठोर शिक्षा व्हावी व तो गावात परत येऊ नये असे एका सुरात आवाज उठलेले आहे.
सदर घटनेतील संपूर्ण तपास नागभीड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. वैभव कोरवते , यांच्या कडे आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!