असाध्य रोगांवर मोफत उपचार' अशा भूलथापांना बळी पडू नका!' नोंदणीकृत डॉक्टर/ वैद्यांचा सल्ला घ्या. अभाअंनिसचे आवाहन.
असाध्य रोगांवर मोफत उपचार' अशा भूलथापांना बळी पडू नका!'
तळोधी बा (यश कायरकर,) ;
*'असाध्य रोगांवर मोफत उपचार'* अशा बातम्या काही वर्तमानपत्रांतून व सोशल मीडिया वर प्रकाशित होऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालत असून यामुळे रोगिंना आपले जीव गमवावे लागत आहेत.
असेच ब्रम्हपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील 'प्रमीला मेश्राम' यांनी विधीपूर्वक जळीबुटीने रोग बरे करण्याचा दावा केला आहे . त्यांच्या औषधाने कावीळ, टायफाईड, अंगदुखी यासारखे आजार बरे होतात अशी माहिती सोशल मीडिया वर बातमीत प्रकाशित झालेली आहे. व त्या भागातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी सुध्दा अशा उपचारांचे समर्थन केलेले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून अवैज्ञानिक उपचारांना प्रोत्साहन देणारी आहे.
कोणत्याही रोगांवर उपचार करण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असणे आवश्यक आहे, अन्यथा मेडिकल प्राक्टिशनर ॲक्ट १९६१ अंतर्गत गून्हा ठरतो. तसेच असाध्य रोगांवर मोफत उपचार अशा जाहिरातीवजा बातम्यांमुळे मैजिक रेमिडीज अक्ट १९५४ नुसार गुन्हा आहे.
वैद्यकीय उपचारापासून परावृत्त करुन अशा अवैज्ञानिक बाबिंचा प्रचार प्रसार करणे हा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ नुसार गुन्हा आहे.
"बातमीत प्रकाशित केलेले स्वयंघोषित वैद्य जनतेच्या अज्ञानाचा लाभ उठवत आहेत. काही आजार पुरेशा विश्रांतीनंतर स्वयंसुचना दिल्यानंतर आपोआप बरे होतात.औषधांची गरज पडत नाही.जे असाध्य आजार आहेत ते यांच्या औषधांनी बरे होत नाही.यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय शिक्षण नाही. लोकांच्या मानसिकतेचा लाभ हे भोंदू वैद्य उठवत आहेत.
स्वतः ला सुशिक्षित म्हणवणारे आणि त्यांचेवर प्रबोधनाची जबाबदारी आहे असे ही अधिकारी या प्रकारांना बळ देतात.
तरी अशा प्रकारच्या फसव्या जाहिराती पासून जनतेने सावध रहावे."
असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक 'हरिभाऊ पाथोडे' यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!