बोर्डा बोरकर येथे मोहरम उत्सव संपन्न
तालुक्यातील बोर्डा बोरकर येथे मागील दहा दिवसापासून चालू असलेला मोहरम आज जुलूस सवारी काढून विसर्जीत करण्यात आला. पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा येथील दर्गावर मागील 50 वर्षांपसून मोहरमचा जुलूस काढल्या जाते. या निमित्त बोर्डा गावात तालुक्यातील हजारो नागरीक व हिंदू मुस्लीम भक्त येथे जत्रेने येत असतात. या निमीत्त गावात जत्राही भरत असते.
पूर्वी मोहरमची सवारी मुस्लीम मौलवीने काढणे सुरू केले होते, मात्र आता हिंदू मुस्लीम मिळून ही सवारी काढत असल्यांची माहिती आहे. हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणूनही या सवारीकडे पाहिले जाते.
नवसाला पावणारा दर्गा अशी या दर्गाची ओळख आहे. नवस बोलणारे नवस फेडण्याकरीता येथे नियमीत येत असतात.या निमित्ताने अग्नी प्रज्वलीत करून त्यावर चालतात. निखिल नैताम, धोंडू दुधबळे, शहनाज आलाम, हे सवारी काढण्यात पुढाकार घेतात. 3 री, 7 वी 9 वी असे दिवस साजरे करून हा उत्सव सतत 10 दिवस केल्या जातो. आंबई गडावर स्नान करीत सवारीचे विसर्जन केले जाते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!