मुल येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली



विश्व आदिवासी दिवसानिमीत्त मूल येथे आदिवासी समाजाने रॅली काढून आदिवासी दिवस साजरा केला. जगातील आदिवासींना एकत्र येण्यांचा हा दिवस असून, जगभरात आदिवासी या दिवसाचे निमीत्ताने काही ना काही उपक्रम साजरे करून, समाजाचे प्रश्न पुढे आणीत असतात. मागील काही वर्शापासून मूल येथेही जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आदिवासींचे देवतांची पारंपारिक पुजा केल्यानंतर, मूल शहरातून ढोल तासांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. बिरसा मुंडा अमर रहे, वीर बाबुराव शेडमाके यांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या रॅलीत आदिवासी महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी होत, आदिवासींचे पारंपारिक नृत्य सादर केले. मुख्य मार्गावरून ही मिरणूक काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी नेते उत्तम कुमरे, लक्ष्मण सोयाम यांचेसह अनेक आदिवासी नेते, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!