मुल नगरपरिषदेत तिरंगा विक्री केंद्राचे उद्घाटन
नगर परिषद मुल
स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत "घरोघरी तिरंगा"उपक्रमबाबत नागरिकांकरिता व आस्थापना धारकांकरिता नगर परिषद मूल कार्यालयात महादेव खेडकर प्रशासक नगर परिषद मूल यांच्या हस्ते तिरंगा विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी रविंद्र होळी तहसीलदार, यशवंत पवार, कुंभारे, ठाकरे नायब तहसिलदार व नगर परिषद मूल कार्यालयातील श्रीकांत समर्थ, अभय चेपूरवार, आलेख बारापात्रे व इतर सर्व नगर परिषद मूल कर्मचारी वर्ग उपस्थित होते.तिरंग्याची किंमत ही २५ रुपये ठेवण्यात आलेली आहे. नगर परिषदे तर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की सर्वांनी "घरोघरी तिरंगा" उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!