हिरापूर येथे वाघाच्या हल्ल्यात एक ठार



सावली (रंजिता नायडू)
हिरापूर येथे आज वाघाने हल्ला केल्याने बैल धूत असलेला शेतकरी ठार झाला.
हिरापुर येथे शेतावर काम करण्यासाठी गेलेला शेतकरी हा बैल धूत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला व त्या शेतकऱ्याला ठार करून शिकारी साठी उचलून नेल्याची घटना हिरापूर येथे घडलेली आहे.
भक्तदास श्रीरंग झरकर ४४ वर्ष असे मृतकाचे नाव असून तो हिरापुर येथील रहिवाशी होता.

बाशीचे काम पूर्ण झाल्यानंतर बैलाना चारन्यासाठी किसाननगर शेत शिवारा लागत कोंडेखल मायनर लोडि पुलाजवळ बैल चारत असताना दोन मोठे वाघ परिसरात दबा धरून बसलेले होते. परिणामी वाघाला पाहुन बैल चवताळले त्यामुळे शेती कामावर बैल चारणारे तिन्ही शेतकरी झुडपात लपुन बसले असता वाघाने हल्ला करुन झरकर ला फरकळत नेले उर्वरित लोकांनी आरडाओरड केली असता वाघाने घटनास्थळावरुन पळ काढला

घटनची माहिती होताच सावली वनपरीक्षेत्राचे अधिकारी कार्यालया चे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहे.
मृतकाच्या उच्च स्तरीय तपासणी पुढील कार्यवाही सुरु आहे मृतकाच्या पाश्च्यात पत्नी एक मुलगा मुलगी असा आप्त परिवार असून मृतक हे हीरापुर येथील सामाजिक कार्यकर्ते यांचे मोठे भाऊ आहे त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे त्यामुळे या भागात वन्य जीवांची मोठी दहशत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!