हिंदू जनजागृती समिती तर्फे मुल येथे क्रांतीगाथा प्रदर्शन संपन्न

हिंदू जनजागृती समिती तर्फे मुल येथे क्रांतीगाथा प्रदर्शन संपन्न

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत हिंदू जनजागृती समिती न्यासातर्फे *बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी स्व.चंद्रचूड येनुरकर माध्यमिक विद्यालय, चिखली, तालुका मुल, जिल्हा चंद्रपूर* येथे क्रांती गाथा प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना क्रांतिकारांनी केलेल्या त्यागाबद्दल ,बलीदाना बद्दल जाणीव होऊन त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी ठेवावा  या दृष्टिकोनातून हे प्रदर्शन लावण्यात  आले.
          हिंदू जनजागृती समिती न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन ,असे विविध
समाजोपयोगी  उपक्रम
घेण्यात येतात. 
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या वतीने 
*सौ. मंगला दर्वे, श्री गुणवंत चंदनखेडे व सौ.सुषमा चंदनखेडे* यांनी परिश्रम घेतले. सौ अर्चना येनुरकर यांनी हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
       या उपक्रमाचा लाभ एकूण *१०६ विद्यार्थ्यांनी* घेतला.   
                     
            
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!