रक्षाबंधन‌ : चातुर्मासातील एक सण!

रक्षाबंधन‌ : चातुर्मासातील एक सण! 

आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंतच्या काळाला चातुर्मासाचा काळ मानला जातो. या काळात श्रीविष्णु शय्यानीद्रेत जातात. त्यामुळे वातावरणात रज तमाचे वातावरण वाढले असते आणि सात्विकता कमी झालेली असते. म्हणूनच वातावरणातील सात्विकता टीकुन राहण्यासाठी या काळात आपल्या हिंदु  संस्कृतीत अनेक सण, व्रतवैकल्ये असतात. चातुर्मासात रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पोर्णिमेला येतो. या पोर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नारळी पोर्णिमेच्या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. यामागील कारण म्हणजे सर्व नद्यांचे पाणी समुद्रात येऊन मिळते आणि त्याचे बाष्पीभवन होऊन पाऊस पडतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत निसर्गाच्या प्रत्येक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिची पूजा केली जाते . त्याचप्रमाणे रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण मानल्या जातो. या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्याच्या उज्वल भविष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो  आणि बहिणीला प्रेमाने ओवाळणी म्हणुन भेटवस्तू देतो. भाऊबहिणीने एकमेकांबद्दल प्रेमभाव व्यक्त करण्याचा हा दिवस.
यादिवशी बहिणीने भावाने काहीतरी दिले पाहिजे, अशी अपेक्षा न ठेवता ओवाळले पाहिजे आणि भावाने बहिणीला सात्विक वस्तू भेट म्हणून दिली पाहिजे, ज्यामुळे भाऊ बहिणीचे देवाणघेवाण वाढणार नाही.  कारण या कलीयुगात भाऊबहिणींनी एकमेकांचे देवाणघेवाण संपवण्यासाठीच जन्म घेततेला असतो. भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतो.
      भावाने केवळ आपल्या बहिणीच्याच सुरक्षेची जबाबदारी न घेता समाजातील प्रत्येक मुलीची सुरक्षेची जबाबदारी त्या दिवशी घेतली पाहिजे. या नैतिक जबाबदारीची जाणीव प्रत्येक भावाला असली पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामधून आपल्याला  काहितरी शिकायला मिळत. म्हणूनच जगात आपली संस्कृती श्रेष्ठ मानल्या जाते.
      अजुन एक गोष्ट सांगायची, म्हणजे आजकाल राखीवर देवतेचे चित्र असते, ॐ असलेली राखी असते. जेव्हा राखी काढून आपण इकडे तिकडे ठेवतो. त्यामुळे त्या देवतेचे विडंबन होते. म्हणून देवतेचे चित्र असलेल्या राखी वापरायच्या नाही. राखी वापरली, तरी तिचे योग्य प्रकारे विसर्जन केले पाहिजे.
  अशाप्रकारे चातुर्मासातील रक्षाबंधन हा सण आपण शास्त्र समजून घेऊन साजरा केला, तर त्याचा अध्यात्मिक लाभ आपल्याला मिळेल.
  !! रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!
   सौ.भारती जीवन कोंतमवार, मुल जि.चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!