नवभारत कर्मचारी पतसंस्थेतर्फे गुणवंताचा सत्कार
स्थानिक नवभारत कर्मचारी सहकारी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. संस्थेच्या सभासदांच्या पल्यांचा वर्ग १० वी व १२ वी मध्ये गुणानुक्रमे उत्तीर्ण झाल्याबद्दल सूनिध महेश पानसे, आयुषी विजय निखारे, तन्वी राकेश नखाते, तर एस एस सी मध्ये अपूर्वा विजय सिद्धावांर , उर्वशी अविनाश धानोरे, आर्या भारत सलाम या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसन वासाडे होते.
संस्थेअंतर्गत सभासदांचे जे पाल्य दहावी आणि बारावी च्या परीक्षेत गुणाानुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय येतात अशा पाल्यांचा सत्कार दरवर्षी संस्थेच्या वतीने केला जातो. यावर्षीही अशा गुणवंतांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ यावेळी गुणवंतांना देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अशोक झाडे यांनी केले.
सत्करा बाबत बोलताना प्रा.महेश पानसे, विजय सिद्धावार यांनी संस्थेच्या प्रगत वाटचाली बाबत आणि विद्यार्थ्याच्या सत्कारा बद्धल, संबोधित केले, Ku तन्वी नखाते हिन सत्कारा बाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक अशोक येरमे , संस्थेचे संचालक गुरुदास चौधरी, धीरज नौकरकर, दिनेश जिद्दीवार, सौ विभा वनकर, विजय निखारे, मिलिंद रामटेके उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!