नवभारत विद्यालयात निवडणुकीच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची स्थापना



नवभारत विद्यालयात निवडणुकीच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची स्थापना
मूल येथील नामांकित नवभारत विद्यालय येथे आज निवडणूक प्रक्रिया राबवून मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतर मंत्री यांची निवड करण्यात आली.
शालेय प्रशासनात या मंत्रिमंडळाची मदत घेण्यात येईल असे यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना लोकशाहीची प्रक्रिया समजून यावी, मतदानाची प्रक्रिया समजावी यासाठी मंत्रिमंडळ निवडताना निवडणुकीचा माध्यम वापरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
नवनिर्वाचित विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाचे पर्यवेक्षिका अल्का राजमलवार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!