भाऊंच्या विजयाने बेंबाळ येथिल भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
मूल प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे राज्यांचे जेष्ठ नेते बल्हारपूर मूल विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रीमंडळात समावेष झाल्यांचा आनंदोत्सव बेंबाळ येथे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी साजरा केला.
महाविकास आघाडीची सरकार गेल्यानंतर राज्यात भाजपा शिंदेगट सत्तारूढ झाला. पुन्हा भाजपाची सत्ता येताच मुनगंटीवार हे मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री बनतील हे निश्चित होते. आजच्या मंत्री मंडळाच्या विस्तारात मुनगंटीवार यांना राज्यपाल भगतसिंह कौशारी यांनी मंत्री पदाची शपथ देताच, बेंबाळच्या भाजपाचे कार्यकर्त्यांनी चौकात एकत्र येत, फटाके फोडून आणि डीजेच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. मुनगंटीवार यांचे विजयाचे घोषणाही दिल्या. त्यावेळी उपस्थित चंदू मारगोनवार , मुन्ना कोटगले, रणजीत समर्थ, विलास चापले सरपंच सिंतळा तसेच शकडो कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!