सावरी (बिड) ग्रामपंचायत ने वोडाफोन इस्सार (ATC) टाॅवर ला सिलबंदची कार्यवाही चा दिला ईशारा
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी (बिड)ग्रामपंचायत येथिल वोडाफोन इस्सार कंपनीचे टाॅवर (ATC)आहे पण मागील काही वर्षांपासून कर थकबाकी आहे .सन २००७ ते २०२२ पर्यत कर थकबाकी असून एकूण रक्कम एक लाख सतरा हजार दोनशे पन्नास (११७२५०) आहे. सावरी ग्रामपंचायत ने वोडाफोन इस्सार (ATC) टाॅवर ला वारंवार नोटीस देऊन थकबाकी असलेल्या कर रक्कम मागणी केली असून सुद्धा वोडाफोन इस्सार (ATC) टाॅवर कंपनी कर देण्यास टाळाटाळ करीत आहे.जर पंधरा दिवसांत थकबाकी असलेला कर नाही दिला तर वोडाफोन इस्सार (ATC) कंपनीचे टाॅवर सिलबंदची कार्यवाही करण्याचा ईशारा सावरी (बिड) ग्रामपंचायत ने दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!