कर्मवीर छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

कर्मवीर छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव


देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.       दि १२ अगाष्ट पासून सर्वत्र संततधार पाऊस तर बऱ्याच ठिकाणांहून ग्रामीण भागातील रस्ते बंद असल्याने काही विद्यार्थी यात सहभाग घेऊ शकले नाही. पुर परिस्थिती असूनही विविध कार्यक्रमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग कर्मवीर छात्रालय मुल माध्यमिक विद्यार्थ्यांचे वस्तीगृह यांनी 13 आगष्ट पासून रोज तीन दिवस झेंडावंदन चा  कार्यक्रम आयोजन करून वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, याचे आयोजन करण्यात आले. 
 दिनांक 17 ला समारोपीय  कार्यक्रम मूल येथील पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत यांच्या समवेत सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये मूल येथील सर्व नागरिक सर्व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग मूल येथील उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी, नायब तहसीलदार, मूल येथील पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत, येथील संवर्ग विकास अधिकारी देव घुणावत, गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे, या सर्व अधिकाऱ्यांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत कर्मवीर छात्रालय मूल चे  विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमात सहभागी होऊन अमृत महोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी छात्रालयाचे अधीक्षक अशोक येरमे, ज्येष्ठ पत्रकार विजय सिद्धावार, शिक्षक अरविंद दहिवले, देवगडे गुरुजी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!