शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथील दोघांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - शांताराम किसनदास राठोड, गटनिदेशक (कंत्राटी) व प्रशांत वसंतराव वांढरे, निदेशक (तासिका / मानधन तत्त्वावर) दोन्ही शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर ता. चिमुर जि. चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक करण्यात आली.तक्रारकर्ती हि मौजा चिमुर ता. चिमुर जि. चंद्रपुर येथील रहीवासी असुन ती शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथे तासिका / मानधन तत्त्वावर गणित व अभियांत्रिकी चित्रकला निर्देशक म्हणुन नेमणुकीस आहे. तक्रारकर्ती यांचे माहे फेब्रुवारी २०२२ ते मे २०२२ पर्यंतचे चार महिन्याचे मानधन काढुन दिल्याचे मोबदल्यात व उर्वरित पुढील तिन महिन्याचे मानधन काढण्याचे कामाकरिता शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमुर येथील शांताराम किसनदास राठोड, गटनिदेशक (कंत्राटी) यांनी दि. ११/०८/२०२२ रोजी तक्रारकर्ती कडे १२,०००/- रु. ची मागणी केल्याच्या पडताळणी कार्यवाहीवरुन दिनांक १८/०८/२०२२ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान शांताराम किसनदास राठोड, गटनिदेशक (कंत्राटी) यांनी तक्रारकर्तीकडे १२,०००/- रु. लाचेची मागणी करुन प्रशांत वसंतराव वांढरे, निदेशक (तासिका/मानधन तत्त्वावर) यांचे मार्फतीने लाचरक्कम स्विकारल्याने शांताराम किसनदास राठोड, गटनिदेशक (कंत्राटी) व प्रशांत वसंतराव वांढरे, निदेशक (तासिका / मानधन तत्त्वावर) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास कार्य सुरु आहे.सदरची कार्यवाही ही राकेश ओला, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकॉ. संदेश वाघमारे, पो.अ. अमोल सिडाम, रविकुमार ढेंगळे, म.पो.अ. मेघा मोहुर्ले व ला.प्र.वी. चंद्रपुर चालक सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!