शासकीय औ. प्र. संस्थेत पहिल्या प्रवेशित प्रशिक्षणार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत...
गडचिरोली (प्रतिनिधी)-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असून शिल्प कारागीर योजनेच्या अंतर्गत सत्र २०२२-२३ करिता प्रथमतः प्रवेश घेणाऱ्या सामदा येथील
प्रशिक्षणार्थी कु. क्रितिका भास्कर यंगलवार (ट्रेड- बेसिक कॉस्मेटोलॉजी )आणि घोटपडी भामरागड येथील सरजु नरंगो वड्डे ( ट्रेड- आर .ए. सी), यांचे संस्थेच्या वतीने प्राचार्य संतोष साळुंके आणि प्रवेश समिती द्वारा गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. पहिली प्रवेश फेरी आजपासून सुरू झालेली असून दि. ३ ऑगष्ट पर्यंत राहणार आहे. दुसरी फेरी दि. ८ ऑगष्ट ते १२ ऑगस्ट पर्यंत असणार आहे. जे उमेदवार प्रवेशसाठी शास.औ. प्र. संस्थेत ऑनलाईन प्रवेश अर्ज करू शकलेले नाही , अशा उमेदवारांना नव्याने आँनलाईन अर्ज भरण्याची संस्थेत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे . त्याकरिता संस्थेत मार्गदर्शन कक्ष सुरू झालेले आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे व इतर माहितीसाठी http/admission.dvet.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी. त्यावर प्रवेश प्रक्रिया, नियमावली पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . तसेच संस्थेत यावर्षी जिल्हास्तरीय संस्थेमध्ये पुढील व्यवसायामध्ये प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. एक वर्षीय (अभियांत्रिकी) अभ्यासक्रम यामध्ये मेकॅनिक डिझेल इंजिन, मेकॅनिक ट्रॅक्टर, वेल्डर , प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर , पत्रे कारागीर, मेकॅनिक आटो इलेक्ट्रिशियन एन्ड इलेक्ट्रॉनिक्स, इंटेरियर डेकोरेशन अॅण्ड डिझाईनिंग तर एक वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम म्हणून कम्प्युटर ऑपरेटर एण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट , फक्त मुलींसाठी असलेले सुईंग टेक्नॉलॉजी, बेसिक काॅस्माॅटालाजी ,ड्रेस मेकिंग , फॅशन डिजाईन टेक्नॉलॉजी आहेत. दोन वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे अंतर्गत विजतंत्री, तारतंत्री, जोडारी, कातारी, यंत्र कारागीर, यंत्र कारागीर( घर्षक), तंत्रज्ञ वातानुकूलिकरण व प्रशितन, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल मोटर व्हेईकल , ड्रॉफ्ट्समन सिविल
हे व्यवसाय आहे.
तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा केंद्र तयार करण्यात आले असून कमीत कमी शुल्कात हे अर्ज अचूकपणे भरून देण्याचे काम सुरू झाले आहे.
करीता या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा असे आवाहन
प्राचार्य संतोष सांळुके
यांनी केलेले आहे.
-------------------



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!