चिमूर पोलीस स्टेशन ने जप्त केलेल्या २०७ गुन्ह्यातील पकडण्यात आलेला दारू साठा केला जमीनदस्त

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चंद्रपूर जिल्हयामध्ये दारुबंदी असतांना चिमुर पोलीसांनी दारुबंदी कायद्यान्वये मोठया प्रमाणात कार्यवाही करुन दारुचा मुद्देमाल जप्त केला होता. सन २०१८ ते २०२१ पर्यंतच्या दारुबंदी गुन्हयामध्ये कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी कोर्ट चिमुर येथुन निकाल लागल्याने एकुण २६७ गुन्हयातील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याकरीता अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्या परवानगी करीता पत्रव्यवहार करण्यात आला होता. यापैकी २०७ गुन्हयात जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याची परवानगी प्राप्त झाल्याने आज दिनांक.२३/०७/२०२२ रोजी दुपारी ०३:०० वाजता पासुन जांभुळघाट ते नेरी जाणाऱ्या रोडवर १) देशी दारुच्या ९० मि.ली. च्या एकुण ७,७६० नग, २) १८० मि.ली. च्या एकुण ३९,६०७ नग, ३) विदेशी दारुच्या ९० मि.ली. च्या एकुण ९ नग ४) १८० मि.ली. च्या एकुण १,३२९  नग असा मुद्देमाल जे.सी.पी. च्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही एस.एन. आक्केवार, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वरोरा तसेच मनोज गभने पोलीस निरीक्षक पो.स्टे. चिमुर यांचे मार्गदर्शनात व उपस्थितीमध्ये पोलीस हवालदार शामराव धुर्वे, विलास निमगडे, पोलीस नाईक कैलास आलाम, पोलीस अंमलदार सुखराज यादव, रामेश्वर डोईफोडे, सचिन साठे, सचिन खामनकर, चालक प्रशांत शेडमाके, शरीफ शेख तसेच राज्य उत्पादन शुल्क वरोरा येथील पथकाने पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!