दोन अजगर सापांना दिले जीवदान

दोन अजगर सापांना दिले जीवदान

तळोधी बा(यश कायरकर) 
  तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील बोथली च्या तलावात मच्छीमारांनी लावलेल्या जाळात अडकवून असलेल्या दोन सहा - सहा फूट लांबीचे अजगर सापांना पकडून आज सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान देण्यात आले.
      सावरगाव येथील भोसरीच्या तलावात साप अडकून असल्याची माहिती मिळतात सर्पमित्र घुश्मेश्वर बोरकर व विकास बोरकर यांनी दोन्ही प्रत्तेकी सहा फूट लांबीचे अजगर सापांना मच्छीमारांच्या  जाळ्यातून  सोडवून आणले. नंतर  वन विभागात त्याची  माहिती देऊन जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळेस सर्पमित्र घृष्णेश्वर बोरकर,  स्वाब चे अध्यक्ष व सर्पमित्र यश कायरकर, स्वाब चे सदस्य विकास बोरकर, वेदप्रकाश मेश्राम, आलेवाही पि.आर.टी. सदस्य सचिन रामटेके, सिद्धार्थ गायधने, तळोधी बा. चे वनरक्षक एस. बी. पेंदाम हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!