कै.पंडीत डॉ.तु.वि.गेडाम साहेब यांची ९९ वी जयंती समारंभ संपन्न.
तळोधी (बाळापुर)
कल्याण शिक्षण संस्था , नागपुर चे संस्थापक अध्यक्ष कै.पंडीत.डॉ.तु.वि.गेडाम साहेब यांची ९९ वी जयंती निमीत्त दि.१० जुलै २०२२ रोज रविवारला आदरांजली समारंभ *तपस्विनी सुंदराबाई पाचराऊत सभागृह तळोधी (बाळापुर)* येथे संपन्न झाला.
जयंती समारंभा च्या अध्यक्षस्थानी उन्मेष गेडाम, अध्यक्ष- कल्याण शिक्षण संस्था, नागपुर हे लाभले होते तर मुख्य अतिथी म्हणुन मा. डॉ .एस.एस.कावळे , प्र-कुलगुरु ,गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर प्रमुख वक्ते म्हणुन डॉ.अशोक गव्हाणकर, प्राचार्य- रावसाहेब ठवरे हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, नागपुर आणि प्रमुख अतिथी म्हणुन सौ मालतीताई गेडाम, सरचिटणिस- कल्याण शिक्षण संस्था,नागपुर हे लाभले होते.तर डॉ.मनोहर टेंभुरकर, एस.टी.सेलोकर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
जयंती समारंभ निमित्ताने *कै.पंडित डॉ.तु.वि.गेडाम साहेब प्रेरणा पुरस्कार* कल्याण शिक्षण संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आले. यामध्ये इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परिक्षामध्ये गुणवत्ता प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख बक्षिस,स्मृतीचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जयंती समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कै.पंडित डॉ.तु.वि.गेडाम साहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक क्षेञातील सेवाकार्याचा गौरव आपल्या भाषणातुन केला. यावेळी आदरांजलीपर स्मृतीपञिकेचे वाचन महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य घनश्याम बुलबुले यांनी केले.
९९ वी जयंती निमित्त आयोजित आदरांजली समारंभाचे सुञसंचालन प्रा.अतुल एन.कामडी यांनी तर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन श्री राजकुमार शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक एस.टी.सेलोकर यांनी तसेच आभार प्रदर्शन प्रा.डॉ. अरुणाभा रॉय यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जयंती समारंभाला गेडाम परिवारातील सदस्य, संस्थेचे समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!