फटाक्याच्या आवाजाने वाघाचे पलायन..
फटाक्याच्या आवाजाने वाघाचे पलायन..
शेगाव (जगदीश पेंदाम)
वरोरा तालुक्यातील चारगाव (बु ) येथे निघालेल्या वाघाला वन विभागाने फटाके फोडले त्या आवाजाने वाघाने गोठ्यातून उडी मारून जंगलाच्या दिशेने पलायन केले...
चारगाव बु) येथे रविवारी दुपारच्या सुमारास शेतशिवारातून वाघ घेऊन संजय लाखे यांच्या गोठ्यात बसस्थान मांडले होते या वाघाला बघण्यासाठी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे वाघ भीतीने त्याच ठिकाणी दडून बसला होता शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी येऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले तो पर्यंत वनविभागाची चमू घटनास्थळी हजर झालेली होती परंतु लोकांची गर्दी पाहता त्या वाघाला बाहेर काढणे शक्य नसल्याने रात्री दहा ते अकरा वाजता च्या सुमारास सर्व गावकऱ्यांना घटनास्थळावरून हाकलून आपापल्या घरी जायला सांगितले ज्यावेळी गाव शांत झाला त्यावेळी वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी फटाके फोडले त्या फटाक्याच्या आवाजाने वाघाने छपरावरून उडी मारून शेत शिवारात धुम ठोकली यावेळी चिमूर ताडोबा येथील वन विभागाच्या कर्मचारी उपस्थित होते..
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वाघ शेतशिवारातच
दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने चारगावचे सभोवताल नदी, नाले तुडुंब भरून असल्याने वाघ तिथून जाऊ शकत नाही त्यामुळे कोणत्यातरी शेतातच वाघ दडूनच असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे वन विभागाने या वाघाला जेरबंद करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.
काल रात्रीच्या सुमारास गाव सांमसून झाल्यानंतर वाघाला जंगलाच्या दिशेने फटाक्याच्या आवाजाने पडून लावलेले आहे आज सकाळी पुन्हा चिमूर वनविभागाची टीम यांनी सर्च अभियान राबवलेले होते त्यानुसार वाघाने जंगलाकडे पलायन केल्याचे दिसून आलेले आहे..
गावाशेजारी वाघ अथवा वन्यजीव दिसून आला तर तात्काळ वन विभागाला संपर्क साधावा..
यु एस नैताम
वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!