बेंबाळ ते बोंडाळा( बुज.) शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याची दुर्दश


नवीन ध्यानबोईवार यांचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

मूल (प्रतिनिधी) 
मूल तालुक्यातील बेंबाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणारा बेंबाळ ते बोंडाळा(बुज.) शेतशिवारातून जाणारा मुख्य रस्ता पावसाने  अतिशय खराब झाला आहे. रस्त्याची दुर्दशा कायम असून नागरिकांना व गावातील बैल बंडी व गुरांना चिखलातून वाट काढावी लागत आहेत.  मागील आमसभेत रीतसर अर्ज देऊन सुद्धा सरपंच व सचिव या कडे दुर्लक्ष करीत आहेत.  मागील दहा ते पंधरा दिवसापासून चालू असलेल्या  संततधार पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या रस्त्याने जाताना चांगलीच कसरत करावी लागते. सदर रस्त्याची मागणी करून सुद्धा ग्रापंचायत सरपंच व सचिव या कडे दुर्लक्ष करीत आहे.
निवडणुकीच्या काळात फक्त आश्वासने दिली जातात मात्र प्रत्यक्षात गावातील समस्यांकडे लक्ष दिले जात नाही. अशी खंत गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे प्रचंड दुर्लक्ष केले आहे असा आरोप शेतकरी पुत्र नवीन ध्यानबोईवार व बेंबाळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!