घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू.

घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या इसमाचा बुडून मृत्यू.
तळोधी बा.
    संततधार पावसाने नागभीड तालुक्यातील ब्रिटिश कालीन घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला.. आणि याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत.. 
  आज नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील इसम परिवारा सोबत पर्यटनासाठी गेला असता त्याचा ओव्हरफ्लो च्या टाका क्रमांक ३ मध्ये बुडून मृत्यू झाला. सदर इसमाचे नाव मधुकर कामडी (45) चिंधीचक असे आहे.. 
घटनेची माहिती कुटुंबियांना होताच. त्यांनी मृतदेहाला बाहेर काढले व मृतदेह घरी घेऊन आले. मात्र घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभाग यांना देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!