यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत भिसीतील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते अरविंद रेवतकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - भिसी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष व माजी सरपंच तसेच सर्वात मोठे सागवानाचे व्यापारी म्हणून ओळख असलेले अरविंद रेवतकर,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रिनिवास शेरकी,भिसी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष अक्षय खवसे, माजी ग्राम पंचायत सदस्य पंकज रेवतकर यांनी १२ जुलै ला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री छगण भुजबळ,हसन मुश्रीफ, राजेश टोपे व राष्ट्रवादी पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते.मागील सहा महिन्यांपासून चिमुर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हाअध्यक्ष राजेंद्र वैद्य हे भिसी व चिमुर येथे अनेकदा येवून गेले.चिमूर विधानसभा क्षेत्रात अरविंद रेवतकर व श्रिनिवास शेरकी यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व निर्माण करेल आणि संस्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीत आपली चमक दाखविणार आहे.जिल्हा परिषद व भिसी नगर पंचायतवर परिणाम होणार असून अरविंद रेवतकर , आणि श्रिनिवास शेरकी हे दोन नेते भिसीच्या ग्राम पंचायतच्या राजकारणातील गुरू- शिष्य म्हणून परिचित आहे.भिसी नगरपंचायतची निर्मिती झाल्यामुळे भिसी नगरपंचायतीची पहिली निवडणूक होणार आहे.भिसी नगरपंचायतवर राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आणण्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतांना दिसणार आहे.आपल्या नव्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी हे दोन्ही गुरू- शिष्य नव्याने राजकीय पटलावर दिसणार आहे.निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसलेला आहे.भिसी नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवर युती होणार नसल्याची चर्चा होत आहे, त्यामुळे भिसी नगरपंचायतीच्या सत्तेपासून भाजपाला दुर ठेवण्यासाठी गुरू - शिष्यांना रणनिती ठरवून प्रत्यक्षात साकार करावी लागणार आहे. पक्षवाढीसाठी प्रयत्न पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा व स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा.असे आदेश अरविंद रेवतकर,व श्रिनिवास शेरकी यांना पक्ष नेत्रूत्वाने दिल्याने दोन्ही नेते कामाला लागल्याची चर्चा आहे.पुढील दोन महिण्यानंतर भिसी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांची जाहीर जंगी सभा होणार आहे.चिमुर भिसी तालुक्यातील शेकडों कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!