आरोग्य शिबिराचे लाभ घेण्याचे ग्रामस्थांना सरपंच अमोल बावनकर यांचे आवाहन

आरोग्य शिबिराचे लाभ घेण्याचे ग्रामस्थांना सरपंच अमोल बावनकर यांचे आवाहन
तळोधी बा.(यश कायरकर) 
            नागभीड तालुक्यातील येनुली माल ग्रामपंचायत सलग्नित धामणगाव येथे येत्या 30 जुलै   आदर्श आरोग्य गाव योजना अंतर्गत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या शिबिराकरिता समस्त गावकऱ्यांनी उपस्थित राहून या भव्य आरोग्य  तपासणी शिबिराचे संपूर्ण ग्रामस्थांनी पुरेपूर लाभ घ्यावा. असे आवाहन लोकनियुक्त सरपंच 'अमोल बावनकर: यांनी गावकऱ्यांना केले आहे.
             या आरोग्य निदान शिबिरात NCD बी.पी. शुगर, तोंडाचे कॅन्सर तपासणी, लहान मुलांचे आरोग्य तपासणी व औषध उपचार , कोविड तपासणी, सिकलसेल तपासणी, डोळ्यांचे आजार तपासणी व औषधोपचार , स्त्रियांचे रोग तपासणी व बुजुर्ग लोकांची तपासणी, आरोग्य इन्शुरन्स   सुद्धा बनवण्यात येणार असून इत्यादी आरोग्य तपासण्या या शिबिरात करण्यात येणार आहेत. 
             येनुली माल येतील सरपंच अमोल बोरकर यांनी या  आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ धामणगाव माल येथीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातील लोकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे
             हे आरोग्य तपासणी शिबिर तालुका आरोग्य विभागामार्फतीने आदर्श आरोग्य गाव योजना अंतर्गत तपासणी तालुक्यातील सात गावांमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये पळसगाव ग्रामपंचायत मधील सावंगी ला 26 तारखेला घेण्यात आला तर कोजबी चक येथे  27 जुलै चिंधी चक येथे 28 जुलै ओवाळा येथे 29 जुलैला येनुली माल ग्रामपंचायत अंतर्गत धामणगाव माल येथे 30 जुलैला किटाडी बोरमाळा ग्रामपंचायत अंतर्गत हुमा येथे  3ऑगस्टला व किटाळी(बोर.) येथे 05 ऑगस्टला अशा प्रकारे हे संपूर्ण शिबिर  तालुका भरात घेण्यात येणार आहे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!