इंदिरानगरमधील अंगणवाडी केंद्रात शौचालयाचा अभाव - बबलू शेख हजरत टिपू सुलतान फाउंडेशन तालुका अध्यक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या इंदिरानगर येथे अंगणवाडी असून येथे मुलांसाठी शौचालयच नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण होत आहे. शौचालयाचे साहित्य आणून ठेवले असूनही ते का लावले नाही, असा प्रश्न हजरत टिपू सुलतान फाउंडेशनचे चिमूर तालुका अध्यक्ष बबलू शेख यांनी उपस्थित केला आहे.शासनाने प्रत्येक अंगणवाडी केंद्रात लोखंडी शौचालय सेट, पाणी टाकी लावून शौचालय सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. या अंगणवाडी केंद्रात मागील दोन वर्षांपासून शौचालय उभारणीचे साहित्य व पाणी टाकी आणून असताना अजूनपर्यंत संबंधित कंत्राटदार किंवा प्रशासनाने ते सुरू केले नसल्याने मुलांना त्रास होत असून शौचालय सुरू करण्याची अंगणवाडी केंद्रात दररोज लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी अध्यक्ष बबलू शेख यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!