वारकरी संप्रदायाचे वतीने सत्संग कार्यक्रम
मूल (मंगला बोरकुटे)
मूल तालुका वारकरी संप्रदायाचे वतीने संत सत्संगाचा कार्यक्रम धार्मिक वातावरणात नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बंडू महाराज पाल होते.स्थानिक गुरुदेव प्रार्थना मंदिरात हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सचिव चेतनानंद कवाडकर, सहसचिव रवी शेरकी, गुरुदास वाढाई, वैशालीताई वंजारी, रजनीताई झाडे इत्यादी संप्रदायाचे सदस्य उपस्थित होते.
व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी यासारखे सामाजिक विषयावर भजन कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!