शाळा प्रवेशोत्सव धुमधद्याक्यात 'शाळा व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळा प्रवेशोत्सव धुमधद्याक्यात 'शाळा व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांचे स्वागत


 पोंभुर्णा(उमरी पोतदार)
 पं. स.पोंभुर्णा अंतर्गत जि. प.उच्च प्राथ. शाळा उमरी पोतदार येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात प्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.नंतर नवगताचे स्वागत करण्यात आले. शाळापूर्व तयारी मेळाव्याचा  दुसरा टप्पा पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला .
        इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कुलबँग,नोटबुक, पेन,पेन्सील, रबर,श्यापनर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप शाळाव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी स्वतः निधी काढून देण्यात आला. तसेच इयत्ता पहिलील ते सातवी च्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण करण्यात आले. यात सर्व पुढाकार  शाळा व्यवस्थापन समितीने घेतला.शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप व गणवेश वितरण करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी  गटशिक्षणाधिकारी सन्माननीय अर्चना मसिरकर  मॅडम यांनी भेट दिली व  नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.शालेय परिसर, विध्यार्थ्यांची उपस्थिती, पालकांचा सहभाग, व्यवस्थापन समितीची सक्रियता ,शिक्षकांचे नियोजन याबद्दल गटशिक्षणअधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला व  विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक सत्राच्या  शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्व शिक्षक कटीबद्ध असल्याची ग्वाही शाळा शिक्षकांनी दिली.या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज मेश्राम, उपाध्यक्ष योगिता पेंदोर,नवनाथ झबाडे,अरुण सोयाम,सरिता तोडसे,जागृती दुधबळे,पूजा औतकर ,कोमल कोडपे ,मंगेश उपरे,रंजन वांढरे,प्रदिप तोडसे,शारदा भेंडारे,रेखाताई मेश्राम, आम्रपाली उपरे, माता पालक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तोडसे ताई , पेंदोर ताई , तसेच  शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय अनिरुद्ध कदम व सर्व शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले व अथक परिश्रमातून सुंदर कार्यक्रम घडवून आणला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!