वाढोणा येथे एच.आय.व्ही, सिकलसेल, बि.पी. शुगर तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न
वाढोणा येथे एच.आय.व्ही, सिकलसेल, बि.पी. शुगर तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न
वाढोणा येथे एच.आय.व्ही, सिकलसेल, बि.पी. शुगर तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न
तळोधी बा(यश कायरकर)
नागभीड तालुक्यातील मौजा वाढोणा येथे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ग्राम पंचायत वाढोणा व प्राथमिक आरोग्य केन्द्र वाढोणा यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय. व्ही, सिकलसेल, बि.पी., शुगर, व महीलाचे आजार यांची रक्त तपासणी व मार्गदर्शन शिबिर संपन्न ....
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. देवेंद्र गेडाम सरपंच तथा अध्यक्ष ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ग्राम पंचायत वाढोणा हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. सिमा मेश्राम एच.आय.व्ही सल्लागार ग्रामिण रुग्णालय नागभीड, सौ. शितल आयलणवार मँडम प्रयोग शाळा तंञज्ञ ग्रामीण रुग्णालय नागभीड, सौ. भोगेकर मँडम, श्री. देवानंद खोब्रागडे, सौ. ढोबरे मँडम, ग्रामिण रुग्णालय नागभीड चे एच.आय.व्ही. , सिकलसेल, बि.पी. शुगर, तपासणी व मार्गदर्शक ची टिम उपस्थित होते यावेळी उपस्थिताना एच.आय.व्ही, सिकलसेव व अन्य आजारावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी समाज सेवा विद्यालय वाढोणा येथील विद्यार्थी, विद्यार्थीनी व गावातील महीला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याची रक्त तपासणी करण्यात आली यावेळी प्रा.आरोग्य केन्द्र वाढोणा चे वैद्यकीय अधिकारी श्री. राहुल डोर्लीकर, कुमारी शितल गायकवाड प्रा.आरोग्य केद्राचे सर्व कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या या कार्यक्रम चे सुञसंचालन श्री. नागदेवतेजी यांनी तर आभार सौ. रंजना वाढई सचिव ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ग्राम पंचायत वाढोणा यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!