मूल वासीयांनो सावधान शहरात आढळले डेंग्यूचे रुग्ण
मूल वासीयांनो सावधान
शहरात आढळले डेंग्यूचे रुग्ण
मूल (प्रतिनिधी)
मूल शहरात घातक समजला जाणाऱ्या डेंगूचे रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.
पावसाळा सुरु झाला असून पावसापूर्व तयारी मुल नगर परिषदेने योग्यरीत्या न केल्याने ठीक ठिकाणी डबके तयार झाले आहे आणि मच्छराचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशातच तापाची ही साथ येणे सुरू झाले असून, ताडाळा रोडवरील एका 24 वर्षे युवतीला ताप आल्याने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तिने मेडीस्टार क्लिनिकल लेबोर्टरी अँड डायग्नोस्टिक सर्व्हिस येथे रक्त चाचणी केली असता Dengue - NS1 antigen - Positive- Faint Pink Line असा रिपोर्ट आल्याने, डेंगू मच्छराची पैदास वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी या युवतीच्या घराजवळीलच एका युवकाला देखील ताप आला आणि डेंगूसदृश्य लक्षणे दिसून आली मात्र औषधाने तो बरा झाल्याची माहिती आहे.
मूल नगर परिषदेची भूमिका समजून घेण्याकरिता आमचे प्रतिनिधींने मुख्याधिकारी मनीषा वजाडे यांच्याशी संपर्क केला असता Ok Bhagate udhya असा रिप्लाय दिला.
या संदर्भात मूल नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक अभय चेपूरवार यांच्याशी संपर्क केला असता, शहरात डेंगूचे रुग्ण आढळल्याची कोणतीही माहिती नगर परिषदेकडे नाही, मात्र रुग्ण आढळले असल्यास काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी आमचे प्रतिनिधी बोलताना दिली.
डेंगूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे झाले आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!