दुपारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद.. काही ठिकाणचे विद्युत पोल पडून विद्युत पुरवठा खंडित..

दुपारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद..
काही ठिकाणचे विद्युत पोल पडून विद्युत पुरवठा खंडित
शेगाव (जगदीश पेंदाम)
 दुपारी तीनच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने वरोरा ते चिमूरकडे जाणारा मार्गावर बामनडोह या ठिकाणावरून पाणी जात असल्यामुळे हा मार्ग बंद झाला, तसेच शेगाव परिसरातील अर्जुनी, तुकुम कोकेवाडा, धानोली,दादापुर शेगावकडे जाणारा पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा सुद्धा मार्ग बंद झालेला आहे..
  
गेल्या पंचवीस ते तिस दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन सगळीकडे विस्कळीत झाले असून नदी,नाले मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहे त्यामुळे शेगाव कडे जाणाऱ्या अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, दादापुर धानोली, हा मार्गावर असणाऱ्या फुलाची उंची कमी असल्यामुळे पावसामुळे हा मार्ग वारंवार बंद पडत आहे..
 तसेच शेगाव परिसरातील अर्जुनी तुकून या ठिकाणचे विद्युत  पोल पळून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!