सरस्वती विद्यालयात सायकल, गणवेश, नोटबुक व छत्र्यांचे वाटप

सरस्वती विद्यालयात सायकल, गणवेश, नोटबुक व छत्र्यांचे वाटप

यश कायरकर,(तळोधी बा.);

           नागभीड तालुक्यातील कोजबी(चक) येथील सरस्वती विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल, गणवेश, नोटबुक व छत्र्यांचे वाटप नुकतेच करण्यात आले.                        
जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे
शाळेचे संस्थापक स्व. इंजिनियर किशोर बारापात्रे यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्य सदर वस्तूंचे वाटप  करण्यात आले. 

या कार्यक्रमप्रसंगी संस्थाध्यक्ष विजय बारापात्रे, सचिव मनीषा बारापात्रे, उपाध्यक्ष संजय सोनकुसरे, सदस्य डाॅ.सुधाकर नवलाखे, गीता बारापात्रे, रेखा बारापात्रे, संकेत बारापात्रे, उत्कर्ष बारापात्रे, खुशी बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर गायकवाड तर आभार विलास तोडासे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!