जनकापूरात बिबट्या च्या हमल्यात तिन शेळ्या ठार गावात भितिचे वातावरण
तळोधी(बा.)
नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे काल रात्रे दोन शेतकऱ्याच्या तिन शेळ्या गोठ्यात येवून बिबट्याने ठार केल्याने गावात दहशत पसरली असुन, या बिबट्या च्या बंदोबस्ताची मागणी नागरीक करित आहेत.
सध्या ग्रामिन भागात धान रोवनीचे काम सुरू आहे. जनकापूर हे गाव जगंलव्याप्त असुन घोडाझरी अभंण्यालगत अड्याळमेंढा जंगल परिसर लागुन आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्याचा वावर अधिक आहे. नेहमिच या गावामधे बिबट्या चे हमल्यात पाळिव प्राणी मारली जाण्याची घटना घडतच असतात. आज पर्यत अनेक शेतकऱ्यांच्या प्राळिवप्राण्यावर बिबट्याने हमल्ला करुन ठार केले आहे.
यातच पुन्हा काल रात्रो दोन वाजताचे दरम्यान बिबट्या ने गावात प्रवेश करून गोठ्यात बांधून असलेल्या एकनाथ खोब्रागडे, व वंदेश खोब्रागडे यांची मालकिच्या तिन शेळ्या अंदाजे(50,000/-) पन्नास हजार रुपये किमंतीच्या शेळ्या ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती वनरक्षक नवघडे यांना देण्यात आली असता मैकापंचनामा करुन मृत्तक शेळ्याना जमिनित पुरण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी.व मानवजिवावर हल्ला करण्या पुर्वी सदर बिबट्या चे बंदोबस्त करण्यात यावा असी मागणी तंमुक्त समितिचे अध्यक्ष अशोक बोरकर, माजी ग्रा.प.सदस्य राहुल रामटेके, माजी उपसरपंच सचिन मसराम, वनहक्कसमिती अध्यक्ष प्रा.अरविंद चंदनखेडे,तथा गावकरी यानी वनविभागाला केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!